श्री साईनाथ सेवा मंडळ
रामपूर, तांबी, रावळगांव यांच्यावतीने दि. ३ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन…
वरवेली गणेश किर्वे
चिपळूण तालुक्यातील श्री साईनाथ सेवा मंडळ
रामपूर, तांबी, रावळगांव यांच्यावतीने तांबी स्टॉप येथे गुरुवार दि. ३ डिसेंबर रोजी श्री सद्गुरू साई बाबा भंडारा तसेच श्री सत्यनारायण महापूजा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. ३ डिसेंबर रोजी
सकाळी १० ते दुपारी १ वा.श्री सत्यनारायणाची महापुजा,
दुपारी १ ते ३ वा.साई भंडारा (भोजन),दुपारी १ ते रात्रौ १ वा. :
तिर्थप्रसाद,रात्री ९ ते रात्रौ ११ वा.
श्री केलमाई देवी भजन मंडळ रावळगाव,रात्री ११ वा. नंतर
शक्ती-तुरा नाचांचा जंगी सामना शक्तिवाले शाहीर राजेश निकम (खेड जि. रत्नागिरी) विरुद्ध ज्ञानदीप भोईंनकर (श्रीवर्धन जि.रायगड) यांच्यामध्ये जंगी सामना होणार आहे. तरी साई भंडारा तसेच शक्ती तुरा जंगी सामना पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन
श्री साईनाथ सेवा मंडळ रामपूर, तांबी, रावळगाव यांनी केले आहे.