गुहागर तालुका युवा सेना पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री नाम. उदय सामंत यांची भेट….
गुहागरच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याची युवा सेनेच्या वतीने ग्वाही…
वरवेली गणेशकिर्वे
गुहागर तालुका युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री नाम. उदय सामंत यांची रत्नागिरी येथे भेट घेतली.
गुहागरच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याची युवा सेनेच्या वतीने पालकमंत्री उदय सामंत साहेब यांना ग्वाही देण्यात आली. पालकमंत्री उदय सामंत यांना भेटण्यासाठी जिल्ह्यातून कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी असताना देखील गुहागर तालुक्यासाठी पूर्ण अर्धा तास साहेबांनी देऊन युवा सेनेतील कार्यकर्त्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले, गुहागर मध्ये शिवसेनेचा आमदार नसताना सुद्धा एवढ्या बहुसंख्येने युवक गुहागर वरून माझ्या पाली येथे गावी आले याचे मला समाधान वाटले आपल्या सर्वांच्या विकासात्मक कामांसाठी मी कायम कटिबद्ध आहे असे वचन यावेळी पालकमंत्र्यांनी तालुक्यातील सर्व युवकांना दिले. भविष्यामध्ये चांगले काम करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भगवा फडकवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी जोमाने काम करा अशा शुभेच्छा देखील दिल्या. गुहागर तालुक्यातील खेड्यापाड्यातील आलेल्या सर्व युवकांचे मनापासून आभार व कौतुक केले. या भेटीदरम्यान गुहागर तालुक्यामधील तरुणांच्या रोजगार बाबत तसेच क्रीडा महोत्सव संदर्भात युवकांच्या वतीने पालकमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. तसेच आरजीपीपीएल व कोकण एल. एन.जी. कंपनीमध्ये तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली .या संदर्भात यावेळी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून रोजगारा संदर्भात युवकांना नक्कीच न्याय दिला जाईल असा शब्द पालकमंत्र्यांनी दिला. तसेच गुहागर तालुक्यामध्ये क्रीडा महोत्सव आयोजित करून जास्तीत जास्त खेळाडूंना या क्रीडा महोत्सवामध्ये विविध क्रीडा प्रकारात सहभागी करण्यात येईल असेही आश्वासन दिले. तसेच नवीन उद्योग आणून रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. यावेळी गुहागर तालुका पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, नगरपंचायत गुहागरचे नगरसेवक अमोल गोयथळे व अमरदीप परचुरे, रुपेश घाग यांचेही मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. युवा सेनेच्या वतीने संपर्कप्रमुख सागर गुजर मंगेश मते, विनायक कांबळे,, कुणाल देसाई व बहुसंख्येने युवा वर्ग उपस्थित होते.