शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव दि.२४ नोव्हेबर रोजी… शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव दि.२४ नोव्हेबर रोजी… गुहागर तालुका युवा सेना पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री नाम. उदय सामंत यांची भेट…. गुहागरच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याची युवा सेनेच्या वतीने ग्वाही… अँन्टि करप्शन बोर्ड (रजि.), यांच्या वतीने मळण गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन जाधव यांना ‘उत्तम कार्यपद्धत सन्मान – बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड प्रदान ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन गुहागरच्या वतीने बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात चित्रांची निवड झालेल्या सौ. प्राची जयेंद्र पोतदार कारेकर यांचा सत्कार

श्रृंगारतळी येथील मंडळाचे संस्थापक कै. सुशील (आप्पा) वेल्हाळ यांची आजही सर्वांना आठवण…..

Share Now:

४० वर्षे देवीची सेवा करणारे श्री निळकंठेश्वर मंडळ शृंगारतळी

वरवेली गणेश किर्वे
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील सन १९८७ साली स्थापन झालेल्या श्री निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळाला सन २०२६ मध्ये ३९ वर्षे पूर्ण होऊन ४० व्या वर्षात पदार्पण झाले आहेत. ३९ वर्षापूर्वी श्रृंगारतळी ही आजच्या बाजारपेठेसारखी गजबजलेली नव्हती ते एक खेडेगाव होते, दुर्गादेवीची स्थापना करून नवरात्री उत्सव करत साजरा करणे, दांडीयारास, गरबा खेळणे हे प्रकार ठिकाणी चालत असे परंतु मंडळाचे भरभरून संस्थापक कै. सुशिल (आप्पा )वेल्हाळ व त्यांचा पुतण्या कै. शरद उर्फ बाबा वेल्हाळ व त्याच्या सहकाऱ्यांनी श्रृंगारतळी येथे सन १९८७ साली या नवरात्री उत्सवाची सुरुवात केली. नवरात्री उत्सव ही मक्तेदारी शहराची नसून ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा उत्सव साजरा करू शकतो हे या मंडळाने पहिल्यांदा दाखवून दिले. त्याचाच परिणाम म्हणून आज गुहागर तालुक्यात गावोगावी हा उत्सव तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो, त्याचे मूळ श्री निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळात आहे, कारण याच मंडळाने हा उत्सव ग्रामीण भागात सुद्धा साजरा होऊ
शकतो हे दाखवून दिले आहे. पाहिल्यावर्षी तर लोखंडी डब्बे वाजवून त्यावरती गरबा, व दांडियारास नाचून लोकांनी आनंदाने सर्वजाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन या उत्सवाची सूरूवात केली, आजही हा उत्सव वर्षानुवर्षे दिमाखात सुरू आहे. हा उत्सव साजरा करताना सर्व धर्म समभाव
जपणे या मंडळाचे ध्येय होते व ते आताही आहे. याचे प्रतीक म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते. सर्व धर्मातील लहानथोर मंडळी या उत्सवामध्ये सहभागी होऊन आनंदाने नाचून उत्साहाने उत्सव साजरा करतात. हिच या मंडळाची खरी ओळख आहे. परंपरेचे ४० वर्षामध्ये उत्सव साजरा करत असताना मंडळाने सामाजिक, कला, सांस्कृतिक , क्रीडा या सर्वच क्षेत्रामध्ये भरभरून काम केले आहे. मंडळाचे संस्थापक कै. सुशील (आप्पा) वेल्हाळ यांचे नेतृत्वाखाली त्याच्या मदतीने या उत्सवाची जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
श्री नीळकंठेश्वर उत्सव मंडळाचे संस्थापक कै. सुशिल (आप्पा) सदाशिव वेल्हाळ असून त्यांच्या आशीर्वादाने मंडळाने गरबा प्रेमीसाठी दररोज रात्री दांडिया रासचे आयोजन करण्यात आले आहे. गुहागर तालुक्यातील सर्वात मोठा नवरात्र उत्सव हा मानला जातो.आजही लोकांना ओढ आहे ती येथील दांडिया रास मध्ये नाचण्याची, दांडिया रास हा येथील उत्सवाचा आकर्षणाचा पैलू आहे. नव्हे तर तालुक्याबाहेरूनही अनेक लोक खास दांडिया खेळण्यासाठी येतात. या उत्सवासाठी मंडळाचे अध्यक्ष मनोज (बापू) कोळवणकर, उपाध्यक्ष जय (दादू) गुहागरकर, उत्सव समिती अध्यक्ष मकरंद विचारे, उत्सव समिती उपाध्यक्ष महेश शिर्के,सदस्य गौरव वेल्हाळ व इतर मंडळाचे पदाधिकारी व सदस्य नवरात्री उत्सवासाठी मेहनत घेत आहेत. उत्सव साजरा
करत असताना मंडळाने सामाजिक, कला, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रामध्ये भरभरून काम केले आहे. मंडळाचे संस्थापक कै. सुशील आप्पा वेल्हाळ यांचे नेतृत्वाखाली त्याच्या मदतीने या उत्सवाची जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
कै. सुशील आप्पा वेल्हाळ यांचे कर्तृत्व व सहकाऱ्याची जिद्द याच जोरावर व स्मृतीवर आजही तेवढ्याच ताकदीने हा उत्सव होत आहे. आपली सामाजिक जाणीव जोपासताना मंडळाने आरोग्य तपासणी आयोजित केली आहे. अनेक स्पर्धा राबवून लहान मुले, महिला, पुरुष यांच्या अंगातील कलागुणांना वाव देण्याचा व त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये म्हणावे तर मंडळाचे वतीने अनेक रेकॉर्ड डान्स व फॅन्सी ड्रेस स्पर्धा यांचे आयोजन करून लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यातआलेला आहे. रेकॉर्ड डान्स व फॅन्सी ड्रेस स्पर्धा या नवरात्री उत्सवातील खास आकर्षण झाले आहे. ज्याला नाचता येत नसेल तो सुद्धा रेकॉर्ड डान्स स्पर्धामध्ये भाग घेऊ शकतो, साध्या कपड्यात उभा राहिला तरी ती फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा स्पर्धक होऊ शकतो,
इतके मन मोकळे व आनंदी वातावरण या उत्सवामध्ये असते हे आवर्जून सांगावेसे वाटते . नवरात्री उत्सव साजरा होत असताना मंडळाच्या वतीने समाजामध्ये वैशिष्ठपूर्ण काम करणाऱ्या लोकांचा गौरव केला जातो, आजही लोकांना ओढ आहे ती येथील दांडिया रास मध्ये नाचण्याची… आनंद घेण्याची.

अधिक वाचा

गुहागर तालुका युवा सेना पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री नाम. उदय सामंत यांची भेट…. गुहागरच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याची युवा सेनेच्या वतीने ग्वाही…

तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील बंद असलेले हेल्थ चेकअप एटीएम मशीन तातडीने सुरू करणे व रिक्त असलेली आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरण्याबाबत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन…