शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव दि.२४ नोव्हेबर रोजी… शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव दि.२४ नोव्हेबर रोजी… गुहागर तालुका युवा सेना पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री नाम. उदय सामंत यांची भेट…. गुहागरच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याची युवा सेनेच्या वतीने ग्वाही… अँन्टि करप्शन बोर्ड (रजि.), यांच्या वतीने मळण गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन जाधव यांना ‘उत्तम कार्यपद्धत सन्मान – बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड प्रदान ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन गुहागरच्या वतीने बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात चित्रांची निवड झालेल्या सौ. प्राची जयेंद्र पोतदार कारेकर यांचा सत्कार

आरे गावचे सुरेशदादा सावंत यांची रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दुसऱ्यांदा निवड

Share Now:

डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाला यश; पालकमंत्री डॉ. उदय सामंत, आमदार किरण सामंत यांचा विशेष पुढाकार

गुहागरच्या सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण
वरवेली गणेश किर्वे
गुहागर तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे बौद्धजन सहकारी संघ (रजि.), तालुका गुहागरचे विद्यमान अध्यक्ष, जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण ( दिशा ) समिती, जिल्हा रत्नागिरी चे सदस्य सुरेश भिकाजी सावंत यांची रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. दिनांक ३ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी येथे ही निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीमुळे गुहागर तालुक्याच्या सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली होती. संचालक मंडळाची स्थापना झाल्यापासूनच सभापतीपदासाठी सुरेशदादा सावंत यांच्या नावाला डॉ. चोरगे यांनी पसंती दर्शविली होती. त्यानुसार सुरेशदादा सावंत यांची सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनीही विशेष पुढाकार घेतल्याचे समजते. ज्येष्ठ संचालक अरविंद गोविंद आंब्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून साहेबराव पाटील यांनी काम पाहिले.
गुहागर तालुक्यातील सहकार क्षेत्रात सक्रिय असलेल्या सुरेशदादा सावंत यांच्यावर आता दुसऱ्यांदा जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा बाजार समितीच्या कामकाजाला नक्कीच फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सावंत यांच्या सभापतीपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांची निवड झाल्यानंतर बौद्धजन सहकारी संघ (रजि.), तालुका गुहागर यांच्या वतीने शृंगारतळी येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा विशेष गौरव केला. व त्यांना शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा

गुहागर तालुका युवा सेना पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री नाम. उदय सामंत यांची भेट…. गुहागरच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याची युवा सेनेच्या वतीने ग्वाही…

तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील बंद असलेले हेल्थ चेकअप एटीएम मशीन तातडीने सुरू करणे व रिक्त असलेली आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरण्याबाबत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन…