गुहागर तालुकास्तरीय किल्ला बांधणी स्पर्धेत पालशेतची बाजी…
२५ स्पर्धकांचा सहभाग
वरवेली गणेश किर्वे
वरंडे विमा सेवा गुहागर, विचारे कृषी पर्यटन केंद्र, नांदलस्कर उद्योग समूह व दत्तभुवन हॉटेल शृंगारतळीचे विवेक पवार यांच्या वतीने गुहागर तालुकास्तरीय किल्ला बांधणी स्पर्धेमध्ये एकूण २५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये सामूहिक गटामध्ये प्रथम क्रमांक विभागून रणवीर बेंदरकर आणि पालशेत ग्रुप (घोडप दुर्ग) व आगडी देवी डान्स ग्रुप पालशेत यांना देण्यात आला. द्वितीय क्रमांक विभागून जिल्हा परिषद शाळा उमराठ नंबर-१ व कलाकार ग्रुप पालशेत यांना जाहीर करण्यात आला. तृतीय क्रमांक विभागून जीवन शिक्षण शाळा गुहागर नंबर-१ व खोतबावा ग्रुप पालशेत यांना जाहीर करण्यात आला तर उत्तेजनार्थ निहार पांचाळ व ग्रुप आबलोली यांना जाहीर करण्यात आला. घरगुती किल्ले स्पर्धेत प्रथम क्रमांक विभागून वल्लभ जाधव गिमवी (प्रतापगड) व आराध्य सावंत (पन्हाळगड) चिखली यांना तर द्वितीय क्रमांक माही मांडवकर पालपेणे व आयुष खैर पालपेणे आणि तृतीय क्रमांक विभागून नैतिक धामणस्कर निगुंडळ व निखिल नितीन गुरव भातगाव यांना जाहीर करण्यात आला आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक प्रेम चव्हाण मोडकाआगर यांना जाहीर करण्यात आला.
स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व मुलांनी दगड माती यांचा वापर करून पर्यावरण पूरक किल्ले अतिशय सुंदर बनवलेले होते. स्पर्धेचे परीक्षण श्री. देशपांडे सर गुहागर कॉलेज व श्री. उमेश डोंगरवार सर व श्री. मकरंद विचारे सर यांनी केले या स्पर्धेचे आयोजन वरंडे विमा सेवा गुहागर, विचारे कृषी पर्यटन केंद्र, नांदलस्कर उद्योग समूह व दत्तभुवन हॉटेलचे श्री. विवेक पवार यांनी केले होते. या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. बक्षीस समारंभाची तारीख स्पर्धकांना कळविण्यात येईल.