ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन गुहागरच्या वतीने बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात चित्रांची निवड झालेल्या सौ. प्राची जयेंद्र पोतदार कारेकर यांचा सत्कार
वरवेली गणेश किर्वे
ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन गुहागरच्या वतीने बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात चित्रांची निवड झालेल्या गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सौ. प्राची जयेंद्र पोतदार कारेकर यांचा सत्कार करण्यात आला.
ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, तालुका गुहागरचे अध्यक्ष सुधाकर शा. कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष सुनील सखाराम जाधव, कार्याध्यक्ष अरुण महादेव मालप, सचिव महेश यशवंत जामसुतकर, सल्लागार दाऊद भाई साल्हे,पूजा कारेकर उपस्थित होते.तसेच
सौ. प्राची जयेंद्र पोतदार कारेकर
ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, गुहागर समितीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
याबालपणापासून चित्रकलेची आवड जोपासणाऱ्या सौ. प्राची जयेंद्र पोतदार कारेकर यांनी आपल्या कलेच्या जोरावर केवळ आई-वडिलांचेच नव्हे, तर आबलोली गावाचेही नाव उज्ज्वल केले आहे.
बालभारतीच्या इयत्ता तिसरी व चौथीच्या कलाशिक्षण तसेच कार्यशिक्षण या पाठ्यपुस्तकांसाठी त्यांच्या चित्रांची निवड होऊन ती प्रकाशित झाली आहेत. हा त्यांच्या कलाप्रवासातील अत्यंत अभिमानास्पद टप्पा असून, त्यांच्या मेहनतीची ही मोठी पावती मानली जात आहे.
लहानपणापासून चित्रकलेची असलेली ओढ त्यांनी आजपर्यंत कायम जपली असून, कलेची साथ कधीच सोडली नाही. विशेष म्हणजे, ज्या बालभारतीच्या पुस्तकांतून त्या लहानपणी शिक्षण घेत होत्या, त्याच बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांसाठी आज चित्रकार म्हणून योगदान देण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
आजही त्या चित्रकलेचे ज्ञान अधिक आत्मसात करण्यासाठी सातत्याने शिकत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना चित्रकलेचे मार्गदर्शन करून आपल्या ज्ञानाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवत आहेत.
त्यांना चित्रकलेचा वारसा त्यांचे वडील प्रवीण रमेश कारेकर यांच्याकडून लाभला आहे. त्यांच्या कलागुणांना आकार देण्याचे आणि लहानपणापासून योग्य मार्गदर्शन करण्याचे मोलाचे कार्य त्यांच्या आई सौ. पूजा प्रवीण कारेकर यांनी केले. तसेच त्यांच्या प्रत्येक कलाप्रवासात पती श्री. जयेंद्र बिपीन पोतदार यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि भक्कम साथ लाभली आहे. सातत्यपूर्ण मेहनत, चिकाटी आणि कलेवरील निस्सीम प्रेम यांच्या बळावर त्या एक उत्कृष्ट चित्रकार होण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहेत.
