शिवार आंबेरे येथील महाविद्यालयात संगणक कक्षाचे उद्घाटन; कै. डॉ. केरोपंत रामचंद्र मजगांवकर चॅरिटेबल ट्रस्टकडून ६ लाख रुपयांची देणगी
वरवेली गणेश किर्वे
श्रमिक किसान सेवा समिती संचालित क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल, श्रमिक विद्यालय आणि लोकनेते शामरावजी पेजे (कला, वाणिज्य, विज्ञान) कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, शिवार आंबेरे (ता. जि. रत्नागिरी) येथे उभारण्यात आलेल्या संगणक कक्षाचे (संगणक लॅब) उद्घाटन मंगळवारी पार पडले.
कै.डॉ. केरोपंत रामचंद्र मजगांवकर चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सौजन्याने आणि ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मा. श्री. शशिकांत रघुनाथ रसाळ यांच्या सहकार्याने या *संगणक लॅबसाठी रक्कम रु. ६ लाख रुपयेची भरीव देणगी देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक संगणक व डिजिटल शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा संगणक कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
या संगणक कक्षाचे उद्घाटन कै. डॉ. केरोपंत रामचंद्र मजगांवकर चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती मनिषा शिरोडकर मॅडम आणि श्रमिक किसान सेवा समितीचे अध्यक्ष श्री. सुरेशजी भायजे साहेब यांच्या शुभहस्ते आणि संस्थेचे सचिव राजसजी मोहिते सर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मधुकरजी थुळ सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील पालक,ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी,रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, तालुका कार्याध्यक्ष बबलू कोतवडेकर,तालुका सचिव रुपेश शेलार, जिल्हा सदस्य नारायण झगडे,माजी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संगणक कक्षाचे औचित्य साधत खास सातारा काँलेज येथून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले डाँ.विजय माने सर,डाँ. केरोपंत मजगांवकर ट्रस्टच्या अध्यक्षा डाँ. मनिषा शिरोडकर मँडम,रघुवीर शेलार,सुरेश भायजे,यांनी बहुमोल मौलीक मार्गदर्शन केले. आंबेकर सर यांनी आभार मानले.व कार्यक्रम समाप्त झाल्याचे जाहीर केले.