दिव्यांच्या रोषणाईने उजळले शृंगारतळीचे श्री नीळकंठेश्वर मंदिर
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रम; हरिकीर्तन आणि महाप्रसादाने सोहळ्याची सांगता

brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 34;

brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 33;
वरवेली | गणेश किर्वे
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर मंदिर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई आणि दिव्यांनी उजळून निघाले होते. श्री नीळकंठेश्वर मंदिर विश्वस्तांच्या वतीने मंगळवारी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सायंकाळी त्रिपुर पूजन आणि नियमित आरती करण्यात आली. मंदिरासमोरील दीपमाळ दिव्यांनी सजली होती.त्यानंतर हरिपाठ झाला. रात्री ह.भ.प. नारायण महाराज पवार (अडरे-अनारी) यांचे हरिकीर्तन संपन्न झाले. यावेळी श्री नीळकंठेश्वर मंदिर विश्वस्त, शृंगारतळी यांच्यावतीने जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार
ह.भ.प. नारायण महाराज पवार यांचा सत्कार करण्यात आला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री नीळकंठेश्वर मंदिर विश्वस्त, शृंगारतळी यांनी मेहनत घेतली.