शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव दि.२४ नोव्हेबर रोजी… शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव दि.२४ नोव्हेबर रोजी… गुहागर तालुका युवा सेना पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री नाम. उदय सामंत यांची भेट…. गुहागरच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याची युवा सेनेच्या वतीने ग्वाही… अँन्टि करप्शन बोर्ड (रजि.), यांच्या वतीने मळण गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन जाधव यांना ‘उत्तम कार्यपद्धत सन्मान – बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड प्रदान ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन गुहागरच्या वतीने बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात चित्रांची निवड झालेल्या सौ. प्राची जयेंद्र पोतदार कारेकर यांचा सत्कार

गुहागर रुग्णालयाची आरोग्य मंत्र्यांचे ओ.एस.डी. यांच्याकडून पाहणी…. रुग्णालयाची नवीन इमारत, रिक्त असलेले स्त्री रोग तज्ञ पद व इतर रिक्त पदावर चर्चा..

Share Now:

वरवेली गणेश किर्वे
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नातुन आरोग्य मंत्री आबीटकर यांनी आपले सहकारी ओ .एस. डी. (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी)अजित जंगम व कदम यांना गुहागर ग्रामीण रूग्णालयात पाठवून ग्रामीण रूग्णालयाची पाहणी करून येथील समस्या जाणून घेतली. या ठिकाणी रुग्णालयाच्या नवीन इमारती संदर्भात चर्चा करण्यात आली .तसेच स्त्री रोग तज्ञ पद रिक्त असल्याने अनेक समस्या निर्माण होत असून स्त्री रोग तज्ञ तातडीने भरावे अशी त्यांच्याकडे मागणी करण्यात आली. तसेच या ठिकाणी असलेल्या रिक्त पदांवर देखील चर्चा झाली
येथील नागरिकांच्या असणाऱ्या विविध समस्या आरोग्यमंत्र्याचे ओएसडी जंगम व कदम यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी सांगितले की,गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे गुहागर ग्रामीण रूग्णालयाची नवीन इमारत होण्यासाठी आरोग्य मंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा करत आहेत. त्यांची मागणी आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून येथील नागरिकांना एक चांगल्यापैकी सुसज्ज असे सर्व सुविधायुक्त असे रुग्णालय बांधण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बळवंत उपस्थित होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गुहागर शहर प्रमुख सिद्धीविनायक जाधव, उपशहर प्रमुख प्रविण रहाटे,महीला शहर प्रमुख सारीका कनगुटकर,युवा शहरप्रमुख राज विखारे,तालुका ग्राहक मंच अध्यक्ष विश्वनाथ रहाटे, शाखाप्रमुख प्रभुनाथ देवळेकर, कल्पेश बागकर,रविंद्र बागकर, कुणाल रहाटे,माजी शिवसेना सचिव बंड्या वाघधरे , विभाग प्रमुख पराग मालप, संतोष गुहागरकर,महीला रूग्ण कल्याण समीती सदस्य संगिता वराडकर,रूग्णकल्याण समीती सदस्य राहूल कनगुटकर,जेष्ठ शिवसैनीक राजेंद्र आरेकर व बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

अधिक वाचा

गुहागर तालुका युवा सेना पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री नाम. उदय सामंत यांची भेट…. गुहागरच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याची युवा सेनेच्या वतीने ग्वाही…

तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील बंद असलेले हेल्थ चेकअप एटीएम मशीन तातडीने सुरू करणे व रिक्त असलेली आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरण्याबाबत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन…