शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव दि.२४ नोव्हेबर रोजी… शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव दि.२४ नोव्हेबर रोजी… गुहागर तालुका युवा सेना पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री नाम. उदय सामंत यांची भेट…. गुहागरच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याची युवा सेनेच्या वतीने ग्वाही… अँन्टि करप्शन बोर्ड (रजि.), यांच्या वतीने मळण गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन जाधव यांना ‘उत्तम कार्यपद्धत सन्मान – बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड प्रदान ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन गुहागरच्या वतीने बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात चित्रांची निवड झालेल्या सौ. प्राची जयेंद्र पोतदार कारेकर यांचा सत्कार

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने माणुसकीचा धर्म जपला….

Share Now:

आर्यन वराडकर वेदांत पडवळ यांनी वृद्ध आजींना सुखरूप पोहोचवले घरी!
वरवेली गणेश किर्वे
सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना गुहागर तालुक्यात घडली.

गुहागर येथील सरकारी रुग्णालयाजवळील रस्त्यावर एक वृद्ध आजी उन्हात एकट्याच बसलेल्या आढळून आल्या. त्या आपल्या घराचा रस्ता विसरल्या होत्या. तसेच त्यांना व्यवस्थित चालताही येत नव्हते. अशा परिस्थितीत त्या असहाय्य अवस्थेत असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर्यन वराडकर, राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष वेदांत पडवळ आणि रुद्र पाटील यांनी तत्काळ आजींची विचारपूस केली.

त्यांना पिण्यासाठी पाणी व खाण्यासाठी बिस्किटे देऊन धीर दिला. त्यानंतर आजींच्या घराचा पत्ता शोधून त्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवले.

राजकारणासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून गरजू आणि असहाय्य व्यक्तींना मदतीचा हात देण्याचे काम या तरुणांनी केले. त्यांच्या या तत्परतेमुळे एका वृद्ध आजीला मोठा दिलासा मिळाला.

समाजकार्य हे केवळ पदापुरते मर्यादित नसून, गरजेच्या वेळी माणुसकीने मदतीसाठी धावून जाणे हेच खरे समाजकार्य आहे, याचा प्रत्यय या घटनेतून आला.

अधिक वाचा

गुहागर तालुका युवा सेना पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री नाम. उदय सामंत यांची भेट…. गुहागरच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याची युवा सेनेच्या वतीने ग्वाही…

तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील बंद असलेले हेल्थ चेकअप एटीएम मशीन तातडीने सुरू करणे व रिक्त असलेली आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरण्याबाबत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन…