शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव दि.२४ नोव्हेबर रोजी… शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव दि.२४ नोव्हेबर रोजी… गुहागर तालुका युवा सेना पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री नाम. उदय सामंत यांची भेट…. गुहागरच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याची युवा सेनेच्या वतीने ग्वाही… अँन्टि करप्शन बोर्ड (रजि.), यांच्या वतीने मळण गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन जाधव यांना ‘उत्तम कार्यपद्धत सन्मान – बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड प्रदान ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन गुहागरच्या वतीने बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात चित्रांची निवड झालेल्या सौ. प्राची जयेंद्र पोतदार कारेकर यांचा सत्कार

मार्गताम्हाणे येथे विहिरीत पडलेल्या दुर्मिळ पिसोरी हरणाची वनविभागाकडून सुरक्षित सुटका…

Share Now:

मार्गतामाने वार्ताहर
चिपळूण तालुक्यातील मौजे मार्गताम्हाणे खुर्द पैकी सुतारवाडी येथील रहिवासी प्रताप सुर्वे (सुर्वे सर) यांच्या मालकीच्या आंबा-काजू बागेतील विहिरीमध्ये एक वन्यप्राणी पडल्याची माहिती त्यांनी वन विभागाचे श्री. एस. एस. सावंत, वनपाल चिपळूण यांना दिली.

माहिती मिळताच वन विभागाच्या बचाव पथकातील श्री. एस. एस. सावंत, वनपाल चिपळूण, श्री. राहुल गुंठे, वनरक्षक रामपूर, श्री. कृष्णा इरमले, वनरक्षक कोळकेवाडी व RRT टीमचे सदस्य श्री. अथर्व घाग यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पडलेल्या वन्यप्राण्याची पाहणी केली असता, सदर प्राणी हा ससा नसून दुर्मिळ पिसोरी हरण असल्याचे निदर्शनास आले. वनविभागाच्या बचाव पथकाने सदर पिसोरी हरणाची सुरक्षित सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

यावेळी हरणाने विहिरीतील पाण्यात उडी मारून पोहण्यास सुरुवात केली. बचाव पथकाने अथक प्रयत्न करून जाळीच्या साहाय्याने त्यास सुरक्षितपणे पकडले व पिंजऱ्यात ठेवून त्याची वैद्यकीय व शारीरिक स्थिती तपासली. सदर पिसोरी हरीण सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. सदर बचावकार्य मा. श्रीमती गिरिजा देसाई, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण), मा. श्रीमती प्रियंका लगड, सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) व मा. श्री. एस. एस. खान, वनपरिक्षेत्र अधिकारी, चिपळूण यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

अधिक वाचा

गुहागर तालुका युवा सेना पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री नाम. उदय सामंत यांची भेट…. गुहागरच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याची युवा सेनेच्या वतीने ग्वाही…

तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील बंद असलेले हेल्थ चेकअप एटीएम मशीन तातडीने सुरू करणे व रिक्त असलेली आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरण्याबाबत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन…